चाकणच्या महिला सरपंचानी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद

चाकण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिनानिमित्त देशभरातील काही निवडक सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

 शेतकऱ्यांविषयी घेतली माहिती

चाकण :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिनानिमित्त देशभरातील काही निवडक सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यात चाकणच्या मेदनकरवाडी येथील सरपंच प्रियंका मेदनकर-चौधरी यांचा ही समावेश होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांविषयी माहिती घेतली. मोदी यांच्याशी बोलण्याची इच्छा आज पूर्ण झाली आहे, अशी प्रतिक्रिया प्रियांका यांनी दिली
पुण्यातील खेड तालुक्‍यातील मेदनकरवाडी ग्रामपंचायत सरपंच प्रियांका मेदनकर-चौधरी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याची संधी मिळू शकते, असा फोन झेडपीमधून सरपंच प्रियंका यांना आला होता. त्यानंतर गुरुवारी महाराष्ट्रातून एकमेव प्रियांका यांची निवड झाल्याचं दिल्लीहून फोनद्वारे सांगण्यात आणि आज अकराच्या सुमारास तयार राहण्यास सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याची खूप इच्छा होती, ती आज पूर्ण झाली अस प्रियंका सांगतात.
प्रियांका म्हणाल्या, “देशाच्या पंतप्रधानांशी बोलायचं असल्याने अगोदर खूप दडपण आलं होतं. रात्रभर झोप लागली नव्हती. परंतु, नरेंद्र मोदी यांनी घरातल्या व्यक्तीप्रमाणं माझ्याशी बोलले. मेदनकरवाडीमधील नागरिक आणि शेतकऱ्यांविषयी विचारपूस केली. करोनाविषयी माहिती घेतली. जगभरात करोनाने थैमान घातले असून याच्याविरोधात पंतप्रधान लढत असल्याने जगभरातून कौतुक होत आहे. या संदर्भात प्रियांका यांनी कविता सादर करत नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
मेदनकरवाडी ही चाकणच्या औद्योगिक भागात येत असल्याने अनेक परराज्यातील नागरिक या ठिकाणी कामाला आहेत. करोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. परंतु, दोन हजार परप्रांतीय व्यक्तींना रेशन नसल्याने लोकवर्गणी आणि कंपनीच्या माध्यमातून अन्नधान्याच्या किट दिल्या आहेत. आणखी तीन हजार वाटप करणार असल्याचं यावेळी त्यांनी आवर्जून सांगितलं.