..असे कसे ना.? हे सरकार लबाड सरकार आहे ; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

एकाच सरकारमधले वडेट्टीवार वेगळं म्हणतात? त्यांच्या सुरात सुर मिसळून पृथ्वीराज चव्हाण बोलतात. त्यांच्या सुरात सूर मिसळून नाना पटोले बोलतात.. सगळ्या विषयांमध्ये सरकारमधला प्रत्येक घटक हा वेगळी भूमिका मांडतो. वीजबिल विषयामध्ये तेच झाले आहे. आता काल त्यांनी तारीख दिली की आठ दिवसांत नवी तारीख देतो का विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा का? अजित पवारांकडून अशा धरसोड वृत्तीची अपेक्षा आपल्याला नव्हती, असे पाटील म्हणाले.

    पुणे: पुण्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली होती. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्दा अजित पवारांची विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरु आहे. त्यांचे आप आपसात समन्वय नाही. एक जण म्हणते हे करा एक जण म्हणते ते करा ..असे कसे ना.? हे सरकार लबाड सरकार आहे. अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

    एमपीएससीच्या मुद्द्याचा संदर्भ देत पाटील म्हणाले की, एकाच सरकारमधले वडेट्टीवार वेगळं म्हणतात? त्यांच्या सुरात सुर मिसळून पृथ्वीराज चव्हाण बोलतात. त्यांच्या सुरात सूर मिसळून नाना पटोले बोलतात.. सगळ्या विषयांमध्ये सरकारमधला प्रत्येक घटक हा वेगळी भूमिका मांडतो. वीजबिल विषयामध्ये तेच झाले आहे. आता काल त्यांनी तारीख दिली की आठ दिवसांत नवी तारीख देतो का विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा का? अजित पवारांकडून अशा धरसोड वृत्तीची अपेक्षा आपल्याला नव्हती, असे पाटील म्हणाले.

    पुढे म्हणाले की, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित दादांनी वीज बिलासंदर्भात भूमिका घेतली. कनेक्शन कट करणार नाही सांगितले आणि शेवटच्या दिवशी ते बदलले. अजित दादांकडून तरी माझी ही अपेक्षा नव्हती. असे पाटील म्हणाले.