मराठा आरक्षण हा राज्याचा विषय असल्याचं नरेंद्र मोदी यांचं मत,चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

मराठा आरक्षण(Maratha Reservation) हा माझा विषय नाही, राज्याचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra  Modi) यांचे मत असल्याची माहिती चंद्रकांत पाटील (Chandrakant Paitl) यांनी दिली आहे.

    पुणे: मराठा आरक्षण(Maratha Reservation) हा माझा विषय नाही, राज्याचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra  Modi) यांचे मत असल्याची माहिती चंद्रकांत पाटील (Chandrakant Paitl) यांनी दिली आहे. पुण्यात एका कार्यक्रमा दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलताना त्यांनी हे सांगितले.

    “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या रस्त्यावरचे आंदोलन सामुहिक आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरेल,” असा इशारा दिला छत्रपती खासदार संभाजी राजे भोसले यांनी दिला. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी त्यांनी ४ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही दिले. मात्र भेटीसाठी वेळ न दिल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान याबाबत विचारले असता, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी राजेंनी त्यांचं मत मांडलं, मेटेंनी त्यांचं मत मांडलं. “हा विषय माझा नाही, राज्याचा आहे,” असं पंतप्रधान मोदींचे म्हणणं आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांची भेट झाली नाही, असा खुलासा पाटील यांनी केला आहे.