If not, leave the post of Guardian Minister; Chandrakant Patil's advice to Ajit Pawar

ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, अशी घोषणा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समाचार घेतला आहे.'चंद्रकांत पाटील जागे असताना बोलले की झोपेत बोलले,' असे म्हणत अजित पवार यांनी त्यांची खिल्ली उडविली आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थिती आणि उपाययोजनांच्या आढावा बैठकीनंतर अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

    पुणे : ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, अशी घोषणा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समाचार घेतला आहे.’चंद्रकांत पाटील जागे असताना बोलले की झोपेत बोलले,’ असे म्हणत अजित पवार यांनी त्यांची खिल्ली उडविली आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थिती आणि उपाययोजनांच्या आढावा बैठकीनंतर अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘राज्यात सत्ता नसल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत आहे. आमचे सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केले होतं,’ असा सवाल यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

    “जोपर्यंत तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणार आणि जनतेच्या हिताचे काम करणार आहे. राज्यात आपण सत्तेत नसल्याने भाजप नेत्यांना असह्य झाले आहेत, नव्हे त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत आहे. कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात असा टोलाही अजित पवारांनी लगावला.