चंद्रकांत पाटलांनी 42 कोटींचा महसूल बुडविला; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

वाघोली परिसरातील केसनंद हवेली येथील 42 एकर जमिनीसंदर्भात आपल्या पदाचा दुरुपयोग करून चुकीचा निर्णय देत सरकारचा 42 कोटी रुपयाचा महसूल बुडविला. 1961 साली सरकारने म्हातोबा मंदिर ट्रस्टच्या नावावर केलेली जमीन एका बांधकाम व्यावसायिकाच्या नावावर शकते असा आरोप त्यांनी केला आहे. लवांडे म्हणाले, वाघोली येथील ही जमीन मूळची देवस्थान इनाम वर्ग 3 ची जमीन हस्तांतरीत करताना राज्य शासनाचा नजराणा भरावा लागतो.

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी ईडीने तब्बल 9 तास चौकशी केली होती. यानंतर राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. माजी महसूलमंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचा 42 कोटींचा महसूल बुडविल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पुण्यातील वाघोली येथील जमीन विक्री व्यवहारात पाटील यांनी चुकीचा निर्णय घेत राज्य सरकारचा 42 कोटी बुडविल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे.

    वाघोली परिसरातील केसनंद हवेली येथील 42 एकर जमिनीसंदर्भात आपल्या पदाचा दुरुपयोग करून चुकीचा निर्णय देत सरकारचा 42 कोटी रुपयाचा महसूल बुडविला. 1961 साली सरकारने म्हातोबा मंदिर ट्रस्टच्या नावावर केलेली जमीन एका बांधकाम व्यावसायिकाच्या नावावर शकते असा आरोप त्यांनी केला आहे. लवांडे म्हणाले, वाघोली येथील ही जमीन मूळची देवस्थान इनाम वर्ग 3 ची जमीन हस्तांतरीत करताना राज्य शासनाचा नजराणा भरावा लागतो.

    2008 मध्ये तत्कालीन पुणे विभागीय आयुक्त नितीन करीर यांनी यासंदर्भात निकाल देताना नजराणा भरण्याशिवाय या जमिनीचा कायदेशीर व्यवहार होऊ शकत नाही, असा निकाल दिला होता. त्यानंतर अर्जदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असता त्यांनी पण तसाच आदेश कायम ठेवला. मात्र, यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि महसूल खाते पाटील यांच्याकडे आले. यानंतर विशाल छगेरा प्रॉपर्टीज इंडिया प्रा.लिमिटेडला ही जमीन विकण्यात आली होती. या दरम्यान 42 कोटी नजराणा माफ झाला होता.