आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी..; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

आम्ही जंगलातल्या वाघाशी आमची दोस्ती करतो,पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. तसेच राज्यात आजही भाजप नंबर एकचा पक्ष आहे हे सांगतानाच त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वेगवेगळ्या निवडणुका लढण्याचे आव्हान दिले.

    पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी नरेंद्र मोदींनी सांगितलं तर आम्ही वाघाशी दोस्ती करायला तयार आहे असे वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी वाघाशी मैत्री होत नाही तर वाघ ठरवतो कुणाशी दोस्ती करायची, अशा शब्दात उत्तर दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी आहे, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही असा जोरदार टोला लगावला आहे.

    पुण्यात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते. पाटील म्हणाले, संजय राऊत म्हणाले ते अगदी खरे आहे.