पुण्यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल , ‘या’ दिवशी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द

'राज्यात फक्त पुण्यामध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येते. पुण्यामध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत असल्याने शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यानुसार आता पुण्यात सकाळी सात ते अकरा या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत,' असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

    पुणे : पुण्यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे.

    ‘राज्यात फक्त पुण्यामध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येते. पुण्यामध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत असल्याने शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यानुसार आता पुण्यात सकाळी सात ते अकरा या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत,’ असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

    पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भातील मागणी आपण आढावा बैठक केली असता, त्यानुसार निर्णय घेतला आहे. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असेल, अशी प्रतिक्रिया पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.