पुणे शहरासाठी तयार केलेल्या कोरोना नियमावलीत बदल ; आता सुरू करण्यात आलेली ‘ही’  दुकाने ठेवावी लागणार बंद

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक निर्बंध हटवण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावलीही पुण्यात लागू झाली आहे. त्यामुळे, स्पा, सलून आणि जिम सुरू ठेवण्याचा निर्णय आता मागे घ्यावा लागला आहे, अशी घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.

    पुणे: शहरात कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यानंतर मागील दोन दिवसापासून कोरोनाच्या नियमामध्ये शिथिलता आणत कोरोना बाबतची नवी नियमावली मुरलीधर मोहळ जाहीर केली. मात्र या नियमावलीत बदल करत स्पा, सलून आणि जिम सुरू ठेवण्याचा निर्णय आता मागे घ्यावा लागला आहे.

    पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक निर्बंध हटवण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावलीही पुण्यात लागू झाली आहे. त्यामुळे, स्पा, सलून आणि जिम सुरू ठेवण्याचा निर्णय आता मागे घ्यावा लागला आहे, अशी घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट
    करून दिली आहे.

    पुण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नवीन नियमावलीनुसार

    पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत. शनिवार, रविवारी माञ फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

    शहरातील उद्याने, हॉटेल बंद राहणार, फक्त पार्सल सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील .

    शासकीय कार्यालयांमध्ये केवळ २५ टक्के उपस्थितीत सुरू राहील.

    मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरू राहतील.

    शॉपिंग कॉम्पलेक्स बंदच राहणार आहेत.

    लग्न, समारंभ, मेळावे बंदच असतील