विनयभंग केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील क्रिडासंकुलनजीक ३० वर्षीय महिलेला शिविगाळ, मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मंचर  : आंबेगाव तालुक्यातील मंचर  येथील क्रिडासंकुलनजीक  ३० वर्षीय महिलेला शिविगाळ, मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना बुधवार दि.२४ रोजी घडली.मंचर पोलिसांनी पाच जणांना अटक केली असुन तिघे फरार असल्याने मंचर पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांनी सांगितले.

मंचर पोलिसांना दिलेल्या फिर्यादित संबधित महिला म्हणते कि आनंद उर्फ सोन्या सुधीर नाटे वय २१ राहणार चोंडेश्वरी गल्ली मंचर यांच्यासोबत मी दारु पित होती.त्यावेळी तेथे आनंद नाटे याचे मित्र राम उर्फ बाळे शिवाजी काळे वय २९ राहणार काळेमळा चांडोली बुद्रुक,संतोष उर्फ पप्पु हरिचंद्र  शिंदे वय २७ राहणार शिंदेमळा अवसरी खुर्द, विजय उर्फ पप्पु नंदकुमार मोरडे वय २२ राहणार मोरडेवाडी , सिद्धार्थ उर्फ गोट्या गौतम गायकवाड वय २४ राहणार चांडोली बुद्रुक, पवन थोरात राहणार मंचर, ओंकार उर्फ राण्या बाणखेले राहणार बाणखेले मळा मंचर,तुषार मोरडे राहणार मोरडेवाडी हे आले आणि माझ्या आणि आनंद नाटे यांच्यासोबत दारु पिण्यासाठी बसले. सर्वजण दारु पित असताना आनंद नाटे यांनी माझी ओढणी ओढली. त्यावेळी मी आनंद नाटे यांना ओढणी का ओढलीस असे विचारले असता आनंद नाटे यांनी माझा  विनयभंग केला. मी तेथुन निघुन जात असताना सदर आठ जणांनी मला लाकडी काठीने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मी आरडाओरडा केल्याने तेथे लोक जमा झाल्याने सदर आठ जणांनी शिविगाळ करत तेथुन  निघुन जात असताना याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारुन टाकण्याची धमकी मला दिली. याप्रकरणी  आठ जणांविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात संबधित महिलेने फिर्याद दिली आहे. मंचर पोलिसांनी आनंद नाटे, राम काळे,संतोष qशदे,विजय मोरडे, सिद्धार्थ गायकवाड यांना अटक केली असुन पवन थोरात, ओंकार बाणखेले,तुषार मोरडे हे फरार आहेत. पुढील तपास अजित मडके करत आहे.