कन्टेनरला धडकून चॅसी चालकाचा मृत्यू

आरोपी मयत राजू कदम टाटा कंपनीची नवीन चॅसी (एम एच १४ / टीसीजे ४०३) भरधाव वेगात घेऊन जात होता. काळाखडक -वाकड येथे उभा असलेल्या कंटेनरला (एच आर ५५ / एक्स ७०४९) चॅसीने धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

    पिंपरी : टाटा कंपनीची नवीन चॅसी घेऊन जाणाऱ्या चालकाने कंटेनरला धडक दिली. यामध्ये चॅसी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना ११ मे रोजी रात्री काळाखडक, वाकड येथे घडली. राजू श्रीधर कदम (वय ४५, रा डांगे चौक, थेरगाव) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई एस डी पाटील यांनी याबाबत गुरुवारी (दि. २०) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयत राजू कदम टाटा कंपनीची नवीन चॅसी (एम एच १४ / टीसीजे ४०३) भरधाव वेगात घेऊन जात होता. काळाखडक -वाकड येथे उभा असलेल्या कंटेनरला (एच आर ५५ / एक्स ७०४९) चॅसीने धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. यातच चॅसी चालक राजू कदम गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.