लग्नाचे आमिष दाखवत युवतीची फसवणूक ; पोलिसांचा तपास सुरु

पीडिता आणि फिर्यादीची ओळख झाली होती. त्यानंतर, लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक केली. तसेच, याबद्दल कोठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली.

    पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रारी एका पीडित युवतीने दाखल केली आहे. शादी डॉट कॉम या वेबसाईट वरून पीडिता आणि फिर्यादीची ओळख झाली होती. त्यानंतर, लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक केली. तसेच, याबद्दल कोठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. पीडित मुलीसोबत २०१६ ते १४ मार्च २०२१ या कालावधीत तळवडे परिसरात हा प्रकार घडल्याची तक्रार करण्यात आली आहे

    पीडित महिलेने या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विक्रांत विष्णू स्वाईन (वय ३८, रा. रावेत) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी यांची शादी डॉट कॉम या वेबसाइटवरून ओळख झाली. त्यानंतर, आरोपीने फिर्यादीला भेटून लग्नाचे आमिष दाखविले. मात्र, शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक केली. तसेच, तुला काय करायचे ते कर, अशी धमकीही आरोपीकडून देण्यात आल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटलंय. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.