‘चिअर्स’! लॉकडाऊन असूनही दारू विक्री जोरात  ; पुणे विभागातून माेठ्या प्रमाणावर महसूल जमा

राज्य सरकारला मद्य विक्रीच्या व्यवसायातून महसूल माेठ्या प्रमाणावर मिळत असताे. गेल्यावर्षी काेराेनामुळे देशभरात कडक लाॅकडाऊन लागू केला गेला. सुमारे दाेन ते अडीच महीने मद्यविक्रीची दुकाने बंद हाेती. त्याचा परीणाम उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलावर अल्प प्रमाणात पडला आहे.

    पुणे : काेराेनामुळे बहुतेक व्यवसायाच्या उलाढालीवर परिणाम झाला असला तरी मद्यविक्रीवर विशेष परिणाम झाला नाही. पुणे विभागातून उत्पादन शुल्क विभागाला २०१९- २० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये केवळ आठ लाख रुपयांनीच महसुलात घट झाली आहे. काेराेनाच्या चाैदा महिन्याच्या कालावधीत बिअर विक्रीवर माेठा परिणाम झाल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट दिसत आहे.

    राज्य सरकारला मद्य विक्रीच्या व्यवसायातून महसूल माेठ्या प्रमाणावर मिळत असताे. गेल्यावर्षी काेराेनामुळे देशभरात कडक लाॅकडाऊन लागू केला गेला. सुमारे दाेन ते अडीच महीने मद्यविक्रीची दुकाने बंद हाेती. त्याचा परीणाम उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलावर अल्प प्रमाणात पडला आहे.

    आकडेवारी काय सांगते ?
    मद्य विक्री( लिटर ) दाेन वर्षांचा तुलनात्मक आकडा पुढील प्रमाणे आहे. देशी आणि विदेशी मद्याचा खप तुलनेत थाेडा कमी झाला असून , बिअरच्या खपात मात्र चाळीस टक्के घट झाल्याचे दिसत आहे.

    देशी मद्य :
    २०१९-२० : २ काेटी ९० लाख ६७ हजार ८५१
    २०२०-२१ : २ काेटी ५६ लाख ७७ हजार ३५५

    विदेशी मद्य :
    २०१९-२० : ३ काेटी ४७ लाख ८० हजार १७०
    २०२०-२१ : ३ काेटी १७ लाख १५ हजार ५२६

    बिअर :
    २०१९-२० : ५ काेटी ५२ हजार ५२१
    २०२०-२१ : ३ काेटी २२ लाख ६८ हजार ४६९

    गेल्या दाेन वर्षांत मिळालेला महसुल पुढील प्रमाणे

    २०१९-२० : १ हजार ८०५ काेटी रुपये.
    २०२०-२१ : १ हजार ७९७ काेटी रुपये

    २०१९-२० : ३ हजार ५२६ गुन्हे नाेंदविण्यात आले आणि ९ काेटी १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
    २०२०-२१ : ३ हजार ४० गुन्हे नाेंदविले गेले, ८ काेटी ८७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    ‘‘ मद्य उत्पादन केले जाते, त्याच ठिकाणी उत्पादन शुल्क आकारले जात असते. पुण्यात मद्य उत्पादन करणाऱ्या तीनच कंपन्या आहे. तेथे जेवढे उत्पादन केले जाते, त्याप्रमाणात महसुल हा मिळत असताे. तसेच बेकायदेशीर मद्य उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. काेराेनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाॅकडाऊनच्या काळातही या प्रकारच्या कारवाई विभागाने केल्या आहेत. ’’

    -संताेष झगडे , अधिक्षक , उत्पादन शुल्क विभाग,पुणे