पांढरेवाडीत कंपनीचे केमिकलयुक्त सांडपाणी ;३४२ झाडे जळाली

रावणगाव : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील पांढरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॉट नं. ५ मधील हार्मोनी ऑर्गनिक प्रा. लि. कंपनीचे दूषित केमिकल युक्त सांडपाणी कंपनीच्या बाहेर बाजूस येत आहे. या केमिकलयुक्त दूषित सांडपाण्यामुळे कंपनीला लागून असणाऱ्या कंपाऊंडमध्ये लावलेली ३४२ झाडे जळाली आहेत.

रावणगाव : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील पांढरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॉट नं. ५ मधील हार्मोनी ऑर्गनिक प्रा. लि. कंपनीचे दूषित केमिकल युक्त सांडपाणी कंपनीच्या बाहेर बाजूस येत आहे. या केमिकलयुक्त दूषित सांडपाण्यामुळे कंपनीला लागून असणाऱ्या कंपाऊंडमध्ये लावलेली ३४२ झाडे जळाली आहेत. संबंधित कंपनीचे मॅनेजर निलेश ठाकुर यांना विचारणा केली असता ती झाडे आम्ही लावलेली नाहीत. पावसाचे पाणी तिथे गेल्याने ती झाडे जळाली असावी, तरी संबंधित विषयाबाबत आम्ही काहीही करू शकत नाही, असे उत्तर त्यांनी िदले. संबंधित विषयाबाबत अनेक तक्रार दिली असून सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यामध्ये, तहसीलदार दौंड, औद्योगिक कार्यालय, कुरकुंभ, पुणे,  महाराष्ट्र शासन वन विभाग यांना राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या माध्यमातून वेळोवेळी सुचना देऊन देखील याबाबत काहीही दखल घेतली जात नसल्याचं बोललं जात आहे.

वेळोवेळी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न आम्ही पत्राद्वारे केला असून सुद्धा प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नाही. संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई व्हावी कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.

-शामू लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ