मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रिय ठरले, त्यांना पंतप्रधान करा : पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर देखील टीका केलीय. कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत. दोषी ठरल्यावर कारवाई करा. आधीच्या काळात असं होतं नव्हतं. खडसे यांनी पक्ष बदलल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. भाजपत धुतल्या तांदळासारखे होते आणि नंतर काय झालं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा असं देखील ते यावेळी म्हणाले.

    पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम 13 मुख्यमंत्र्यांमध्ये अव्वल असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं होतं. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत बिघाडीच्या चर्चा रंगल्या होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत सरकार टिकणार की नाही, असे सवाल विचारले जात होते.

    दरम्यान आता काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने सरकार स्थापनेपासून 32 ते 35 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढलं आहे. त्याचा तोटा भरुन काढण्यासाठी कर वाढ केली जात आहे. मोदी सरकार हा तोटा भरून काढण्यासाठी कर्ज तर काढतंय. त्याचबरोबर देशातल्या बँका विकणं, कंपन्या विकणं, एलआयसीचे खासगीकरण करणे असेही प्रकार सुरू असल्याचं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. हे सर्व अत्यंत निंदनीय काम सुरु आहे. काँग्रेसने कमावलं ते मोदी सरकारने गमावलं. कंबरतोड करणारी इंधन दरवाढ केंद्राने मागे घ्यावी, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

    उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा – चव्हाण

    पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर देखील टीका केलीय. कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत. दोषी ठरल्यावर कारवाई करा. आधीच्या काळात असं होतं नव्हतं. खडसे यांनी पक्ष बदलल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. भाजपत धुतल्या तांदळासारखे होते आणि नंतर काय झालं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा असं देखील ते यावेळी म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात. देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात हे मी सांगत नाही, तर आकडे सांगतात. त्यांची विधानं हे दिशाभूल

    करणारी असतात. त्यांनी सरकारमध्ये असताना कोणते निर्णय घेतले?, असा सवाल देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.