मास्क बनवणाऱ्या कंपनीमधील बालकामगार प्रकरण : कंपनी मालकाविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दौंड :देवकरवाडी (ता. दौंड) येथील साई टेअर या मास्क बनवणाऱ्या कंपनी मध्ये पाच बालकामगार आढळून आल्याने संबंधित कंपनी मालक दिलीप पवार यांच्याविरोधात मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०००

 दौंड : देवकरवाडी (ता. दौंड) येथील साई टेअर या मास्क बनवणाऱ्या कंपनी मध्ये पाच बालकामगार आढळून आल्याने संबंधित कंपनी मालक दिलीप पवार यांच्याविरोधात मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २००० अंतर्गत यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केली असल्याची माहिती कामगार अधिकारी गजानन भाऊराव बोरसे यांनी दिली.

    बोरसे यांनी यवत पोलीस ठाणे मध्ये दिलेल्या फिर्यादीत देवकरवाडी येथील साइटवर या मास्क बनविणाऱ्या कंपनीमध्ये बालकामगार काम करत असल्याची ऑनलाइन तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाकडे दाखल करण्यात आली होती. सहाय्यक कामगार आयुक्त समीर चव्हाण यांच्या आदेशानुसार कामगार अधिकारी गजानन बोरसे, दुकान निरीक्षक प्रशांत वंजारी व यवत पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल हेमंत कुंजीर यांनी देवकरवाडी येथील मास्क बनविणाऱ्या कंपनीमध्ये जाऊन पाहणी केली असता याठिकाणी २६ कामगार व पाच बालकामगार काम करत असल्याचे आढळुन आले. कामगारांच्या वेतन हजेरीपत्रक सुरक्षा आदी बाबतची माहिती मागितली असता याठिकाणी कुठलीही माहिती मिळाली नाही.यावेळी बालकामगारांच्या पालकांचे हमीपत्र घेऊन त्यांना सोडण्यात आले.याबाबत कंपनी मालका विरोधत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील आठवड्यात देवकारवाडी ग्रामपंचायतीने मालक पवार यांना बालकामगार कामावर ठेवू नये अशा आशयाचे पत्र दिले असल्याचे ग्रामसेविका भोसले यांनी सांगितले.

      याबाबत कंपनीचे मालक दिलीप पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्या कारखान्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे बालमजूर काम करत नसून संबंधित मुले ही त्यांच्या आईकडे दुपारी येत असतात.गावातील किरकोळ राजकारणातून हा प्रकार करण्यात आला आहे.