सिनेस्टाईलने स्कार्पिओच्या बोनटवर बसून व्हिडिओ शूट करणे हौशी नवरीला पडले महागात ; पोलीस घेतायत शोध

नवरीने सिनेस्टाईलने स्कार्पिओ गाडीच्या बोनटवर बसून लग्नमंडपात जातानाचे व्हिडीओ शूट केले आहे. मात्र स्कार्पिओ गाडीच्या बोनटवर बसून प्रवास करणे ही धक्कादायक आणि कायद्याच्या चौकटीत न बसणारी बाबा असल्याने सध्या पोलिस या हौशी नवरीचा शोध घेत आहेत.

    मुंबई: आयुष्यातील एक महत्त्वाचा व कायम स्मरणात राहणारा सोहळा म्हणजे लग्न होय. हा सोहळा लक्षात राहावा यासाठी हटके स्टाईलने लग्न करण्यासाठी अनेकदा वधू-वराकडून आटोकाट प्रयत्न केले जाताना दिसतात. कधी विमान लग्न लावतात. तर जहाजावर लग्न करताना दिसतात. मात्र काही जोडप्याकडून हटक पद्धतीच्या लग्नाचा नाद स्टंटबाजीत रुपांतरीत होताना दिसत आहेत.
    हटके पद्धतीने लग्न करत ते स्मरणात ठेवण्यासाठी चक्क एका नवरीने सिनेस्टाईलने स्कार्पिओ गाडीच्या बोनटवर बसून लग्नमंडपात जातानाचे व्हिडीओ शूट केले आहे. मात्र स्कार्पिओ गाडीच्या बोनटवर बसून प्रवास करणे ही धक्कादायक आणि कायद्याच्या चौकटीत न बसणारी बाबा असल्याने सध्या पोलिस या हौशी नवरीचा शोध घेत आहेत.

    पुणे-सासवड रत्यावरील दिवे घाटात शूट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे या नवराईने आपला जलवा दाखवला खरा, पण धोकादायक रितीने प्रवास करणे तिला आता महागात पडलं आहे.पण या नवरीने मात्र बोनटवर बसून लग्नामंडपात येत साऱ्यांचंच लक्षवेधून घेतले. अशा प्रकारे बोनटवर हा कायद्याने गुन्हा आहे. आता पोलिस या नवरी मुलीवर आणि तिच्या कुटुंबियांवर कायदेशीर कारवाई करतात का याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.