नागरिकांनी ओढ्या नाल्यांमध्ये केले अतिक्रमण

मंचर : आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये ओढ्या नाल्यांमध्ये अतिक्रमण करण्यास काही नागरिकांनी सुरूवात केली आहे.

 शासकीय यंत्रणा व्यस्त असल्याचा गैरफायदा

मंचर :  आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये ओढ्या नाल्यांमध्ये अतिक्रमण करण्यास काही नागरिकांनी सुरूवात केली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा व्यस्त आहे.त्याचा गैरफायदा उठवत अनेकांनी अतिक्रमणे केली आहे.
कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर संचारबंदी लागू असल्याने सर्वच कामे बंद आहेत.पोलीस व महसूल प्रशासन बंद यशस्वी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.त्यामुळे बंदोबस्ताच्या कामात व्यस्त असताना काही शेतकऱ्यांनी शेतातील ओढ्यात भरावा टाकून ओढा बुजवण्याची कामे सुरु केली आहेत. तर काही गावठाणातील घरमालकांनी अतिक्रमण करुन घरे बांधण्यास सुरुवात केल्याचे  पहावयास मिळत आहे. प्रशासन व्यस्त असल्याचा गैरफायदा अतिक्रमण करण्यासाठी काही नागरिक घेत आहेत .अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी होत आहे.