वडगाव मावळात लसीचा तुटवडा, लसीकरण ठप्प झाल्याने नागरिक त्रस्त

मावळ तालुक्यात करोना लसीचा तुटवडा भासू लागला आहे. करोना लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्याने वडगाव शहरांसह तालुक्यात शासकीय रुग्णालय येथे लसीकरण ठप्प झालंय.

    वडगाव मावळ  : मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरातील लसी केंद्रावर लसीकरणासाठी सतत हेलपाटे घालून ही लस उपलब्ध होत असल्यानं नागरिक आता हताश झाले आहेत.

    मावळ तालुक्यात करोना लसीचा तुटवडा भासू लागला आहे. करोना लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्याने वडगाव शहरांसह तालुक्यात शासकीय रुग्णालय येथे लसीकरण ठप्प झालंय.वडगाव आरोग्य केंद्रावर लसीचा तुटवडा भासत असल्याने प्रत्येक दोन दिवसाने लसीकरण बंद पडत आहे.अद्याप हा तुटवडा कमीच असल्याने नागरिकांना पुरेसे लसीकरण होताना दिसत नाही, त्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.