नागरिकांना झाली ४७ प्रकारचा रानभाज्यांची ओळख

रानभाज्या महोत्सव २०२० उत्साहात

रावणगाव :  उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व कृषी विभाग व आत्मा तसेच भाग्योदय बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  रानभाज्या महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले होते.

११ ऑगस्ट ला तालुका कारंजा येथे पंचायत  समिती सभागृहामध्ये  जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला.  या महोत्सवात काजळेश्वर येथील धनलक्ष्मी स्वयंसहायता समूहा मधील सौ रेखा डिगंबर लांडे यांनी विविध १५ प्रकारच्या  रानभाज्यांची ओळख करुन देवून विक्रीसुध्दा केली.

तसेच कारंजा तालुक्यातील दहा गावांमधून १० समूह वेगवेगळे स्टॉल घेऊन उपस्थित होते. या महोत्वाचे  उद्घाटन आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समीती सभापती  रविता रोकडे, गटविकास अधिकारी, श्रृंगारे, कृषी विभागाचे तोटावार, तालुका कृषी अधिकारी, मंडळाधिकारी, तालुका अभियान व्यवस्थापक आरती अघम, उपस्थीत होते, समूहातील महिलांनी लावलेल्या स्टॉलची पाहणी आमदार पाटणे यांनी केली, समूहातील महिलांना सन्मानपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले. तालुका व्यवस्थापक वर्षा ठाकरे  यांनी रान भाज्या विषयी मार्गदर्शन केले ,स्टाॅल  मधून महिलांनी ४७ प्रकारचा रानभाज्यांची ओळख व महत्व सांगितले. तसेच उमेद अभियाना अंतर्गत उत्पादित वस्तूंची विक्री यामध्ये करण्यात आली ,मोठ्या प्रमाणात अस्मिता पॅड गांडूळ खत ,अबाडीची भाजी व भाकरी,गवती चहा झाड यांची चांगली विक्री झाली, महोत्सवात उमेद अभियानातील समुह व टिम सहकार्य केले.