इंदापूर शहराची वाटचाल कोरोना हाॅटस्पाटच्या दिशेने

कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांचा संख्या २१६६ वर
इंदापूर : तालुक्यातील जनता कर्फ्युच्या कडक अंमलबजावणी सप्ताहानंतर तालुक्यात फोफावलेल्या कोरोना महामारीला आळा बसु शकेल अशी धारणा इंदापूर तालुक्यातील व्यापारी वर्गाची व छोट्या मोठ्या राजकीय पक्षांची व पदाधीकारी यांची होती.परंतु कोरोना महामारीवर जनता कर्फ्युचा कसलाही परिणाम झाल्याचे चित्र सध्यातरी दिसुन येत नाही. इंदापूर तालुक्यात कोरोनाचा कहर जैसा थे, तसाच असुन सोमवार (दि.२१) रोजी तालुक्यात वेगवेगळ्या ठीकाणी एकुण १५० संशयीतांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये एकुण ५२ रूग्णं पाॅझीटीव्ह आढळुन आले असुन त्यामध्ये इंदापूर शहरातील ७ जणांचा समावेश असल्याने इंदापुर शहर हाॅटस्पाॅटच्या दिशेने वाटचाल करत तसल्याचे दिसुन येत आहे.तर जनता कर्फ्युने सर्वसामाण्य व दररोज हातावरचे पोट असणार्‍यांना याचा मोठा आर्थीक फटका बसला आहे.

इंदापूर तालुक्यात कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांचा आकडा हा २१६६ पर्यंत पोहचला आहे. त्यापैकी ७१ जणांचा दुर्दैवी मृृत्यु झालेला आहे. तर सोमवारी २१ सप्टेंबर रोजी इंदापूर कोविड केअर सेंटरमधील रॅपिड आंटिंजन टेस्ट अंतर्गत एकुण ६५ जणांची तपासणी करण्यात आली असुन त्यामध्ये २१ रूग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळले आहेत. बारामती येथील खासगी मंगल लॅबमध्ये २९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १० जण पाॅझीटीव्ह आले आहेत. तर बारामती येथील खासगी गीरीजा लॅबमध्ये ६ जणांची तपासणी करण्यात आली असुन त्यामध्ये २ जण पाॅझीटीव्ह आले आहेत. भिगवण येथील ट्रामा केअर कोविड सेंटरमध्ये एकुण ६० संशयीतांची तपासणी करण्यात आली असुन त्यामध्ये १९ रूग्ण पाॅझीटीव्ह आढळुन आल्याने तालुक्यातील कोरोना रूग्णांचे संकट दुर होण्याचे नाव घेत नाही. पाॅझीटीव्ह रूग्णांवर वेगवेगळ्या ठीकानी उपचार सुरू असल्याची माहीती वैद्यकीय सुत्रांनी दीली आहे.

-इंदापूर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच
इंदापूर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू असुन त्याच्या सोबतीला पावसाचाही जोर आहे.तालुक्यात सर्वत्र पावसाचा जोर असल्याने शेतर्‍यांचे शेतातील हातातोंडाला आलेली पीके पावसाच्या तडाख्याने वाहुन गेली तर फळबागा फळांसह भुईसपाट झाल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच धास्तावलेला शेतकरी परतीच्या पावसाने पुरता भरडुन निघाला असुन पाऊस झोपु देइना आणी कोरोना काम करू देईना अशी गत शेतकर्‍यांची व सर्वसामाण्यांची झाली आहे.