भाजपा आमदारांना फुटू न देण्यासाठीच सरकार पडण्याचे दावे; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या दोन तारखा यापूर्वी  चंद्रकांत पाटलांनी दिल्या होत्या़ देवेंद्र फडणवीस यांनीही तारीख निश्चित केली होती. पण तसे काहीही न घडता दिवसेंदिवस आघाडी सरकार मजबूत होत चालले आहे, असे सांगतानाच भाजपामधील निराश आमदार फुटून बाहेर पडू नयेत यासाठीच त्या पक्षाचे नेते महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याची पोकळ भाकिते करत आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला.

    पुणे : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या दोन तारखा यापूर्वी  चंद्रकांत पाटलांनी दिल्या होत्या़ देवेंद्र फडणवीस यांनीही तारीख निश्चित केली होती. पण तसे काहीही न घडता दिवसेंदिवस आघाडी सरकार मजबूत होत चालले आहे, असे सांगतानाच भाजपामधील निराश आमदार फुटून बाहेर पडू नयेत यासाठीच त्या पक्षाचे नेते महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याची पोकळ भाकिते करत आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला.

    निराश झालेले आमदार भाजपमधून नजिकच्या काळात बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत़ हा धोका फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना स्पष्टपणे दिसून आला आहे़ त्यामुळेच त्या नाराज आमदारांना ‘आपले सरकार लवकरच येणार आहे’ अशा स्वप्नात दंग ठेवण्यासाठीच भाजप नेते महाआघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे दावे अधूनमधून करत असतात असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला.

    भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता असून त्या पक्षाचे आमदार असलेल्या अनेकांना आपणच पक्षात प्रवेश मिळवून दिला होता. त्यांना तिकीटही आपणच मिळवून दिले होते. भाजपामधील अनेक आमदार आपल्याशी मोकळेपणाने बोलतात. पक्षाच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करतात़, असे खडसे म्हणाले.

    हे सुद्धा वाचा