गट सोडल्यावरून तृतीयपंथीयांमध्ये हाणामारी ; दरोडा, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

आरोपी रुक्सार खान ही फिर्यादीची पूर्वीची गुरू आहे. आरोपींनी फिर्यादी व तिच्या मैत्रिणीला चॉपर मारून जखमी केले. तसेच फिर्यादी आणि तिच्या मैत्रिणीकडील मोबाईल तसेच फिर्यादीकडील ३० हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. आरोपी आजम याने फिर्यादीच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केले. वाकड पोलीस तपास करत आहेत.

    पिंपरी : एकमेकांचे गट सोडल्यावरून तृतीयपंथीयांमध्ये झालेल्या वादात दरोडा टाकून एकावर लैंगिक अत्याचार केला. दोन जणांना मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल व रोकड लुबाडून नेले. ही घटना थेरगाव येथे घडली.

    रुक्सार उर्फ इरफान इन्साफ खान, आजम शेख (दोघे रा. मुंबई), अनम, सिमरन उर्फ पवन (रा. मुंबई) आणि तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तृतीय पंथीयाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि सर्व आरोपी तृतीयपंथी आहेत. एकमेकांचे गट सोडून आल्याने त्यांच्यात वाद आहे.