भोर : भोर तालुक्यातील सुमारे दिड हजार श्रमिकांना शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा हद्दीत कामावर जाण्यासाठी कापूरहोळ मार्गे शुक्रवारपासून सशर्त परवानगी दिली आहे.त्यापरिसरातील औदयोगिक व इतर ठीकाणच्या कंपनीत

भोर : भोर तालुक्यातील सुमारे दिड हजार श्रमिकांना शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा हद्दीत कामावर जाण्यासाठी कापूरहोळ मार्गे शुक्रवारपासून सशर्त परवानगी दिली आहे.त्यापरिसरातील औदयोगिक व इतर ठीकाणच्या कंपनीत काम करणा-या श्रमिकांना लॉकडाउनमुळे गेले अडीच महिने घरी बसावे लागले होते.या परीसरांत काम करणा-या श्रमिकांना भोर ते शिरवळ हा मार्ग वडगाव येथे सातारा पोलीसांनी जिल्हाबंदी आदेशामुळे बंद केला होता.चौथ्या टप्यात सरकारने लॉकडाउनचे नियम शिथिल केले.त्यामुळे येथील श्रमिकांना कामावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता.परंतू वडगांव येथे रस्ता बंद केल्यामुळे श्रमिकांना कामावर जाता येत नव्हते. पालकमंत्री अजितदादा पवार यांना ही समस्या समजल्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना

याबाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या.त्यानुसार येथील तहसीलदार अजित पाटील, खंडाळाचे तहसीलदार दशरथ काळे,सातारा जिल्हा उद्योगाचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे यांची बैठक येथे झाली.यावेळी नीरा व्हँली असोसिएशनचे पांडुरंग झांजले, गोदरेजचे प्रशांत गायकवाड,एसीजी फार्माचे योगेश कटारे, रिएटरचे शंकर भुजबळ हाय पावरचे एस.पी.दीक्षित आदी उपस्थित होते.त्यामध्ये सातारा हद्दीमधील कंपनीमध्ये जाण्यासाठी कापूरहोळ मार्गे परवानगी देण्यात आली.त्यानुसार शासनाच्या सर्व नियमांचे, सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करावे.दररोज सातारा हद्दीमध्ये प्रवेश करताना कंपनी ओळखपत्र व स्वताचे ओळखपत्र सोबत ठेवावे. कंपनी व्यवस्थापनाने सर्व कामगारांची यादी तहसीलदार,खंडाळा व भोर यांच्याकडे द्यावी. कंपनीने वाहतुकीची व्यवस्था करावी आदी अटी यावेळी कपंनी व्यवस्थापन व कामगारांवर घालण्यात आल्या.