जुन्नरमधील कापड दुकाने पुढील काही दिवसांसाठी बंद

जुन्नर :वाढत्या कोरोनाच्या भीतीने मुंबईहुन जुन्नर तालुक्यात गावी आलेल्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह निघाल्यामुळे तालुक्यातील अकरा गावांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे २० रुग्ण आढळले असुन, त्यातील एकाचा मृत्यु झाला, तर एक रुग्ण बरा झाला आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात कोरोनाचे १८ अँक्टिव रुग्ण आहेत.

जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथे २ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. उपचारानंतर हा रुग्ण बरा झाला. त्यानंतर जवळपास गेले दोन महिने तालुका कोरोनामुक्त होता. मात्र, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेक नागरिकांनी जुन्नरला आपापल्या गावी धाव घेतली. त्यानंतर २३ मे रोजी धोलवड येथे कोरोनाचा दुसरा रुग्न आढळून आला. तेव्हापासून गेल्या सात दिवसांत तालुक्यात कोरोनाचे १९ रुग्ण आढळले. यातील बहुतेक रुग्ण हे मुबंई येथुन आलेले आहेत. दरम्यान, औरंगपूर येथील रुग्णाचे उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. २८) रोजी  निधन झाले आहे. उर्वरीत अठरा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जुन्नर तालुक्यात बाहेरगावाहून आलेल्या १३ हजार १७२ जणांना २९ मेअखेर क्वारंटाइन करण्यात आले असून, यात होम क्वारंटाइन १२ हजार ४५३, तर संस्थात्मक क्वारंटाइन  ७१९ इतके आहेत. कोरोना संशयित १९८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहे. यापैकी १५३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, यात १९ पॉझिटिव्ह, तर १३४ निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले असून, ४५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
       होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांनी गावात फिरू नये. मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार साबणाने हात  धुवावेत, सोशल डिस्टन्स पाळावे, शक्यतो घरातच थांबावे, कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सावरगाव, खिल्लारवाडी, मांजरवाडी, धोलवड, पारुंडे आणि धालेवाडी तर्फे मिन्हेर या करोनाबाधित गावांचा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.