महाविद्यालये मंगळवारी होणार सुरू ; उद्या महाराष्ट्र बंदची घोषणा केल्याने बदल

लसीकरण न झालेल्या १८ वर्षांवरील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी पुणे महापालिकेमार्फत थेट महाविद्यालय परिसरातच लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी लवकरच महापालिका विशेष मोहीम राबवणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांनी दिली आहे.

    पुणे: पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. पण आता शहरातील महाविद्यालये मंगळवारी सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. लखीमपूर खेरी हत्याकांडाचा निषेध म्हणून सोमवारी (११ ऑक्टोबर) राज्यातील महाविकास आघाडीसोबत, शेतकरी संघटना आणि विविध कामगार संघटनांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. यामुळे सोमवारी विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अडचणी येऊ शकतील म्हणून महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

    विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच दिली जाणार लस!
    लसीकरण न झालेल्या १८ वर्षांवरील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी पुणे महापालिकेमार्फत थेट महाविद्यालय परिसरातच लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी लवकरच महापालिका विशेष मोहीम राबवणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांनी दिली आहे. पुण्यातील महाविद्यालये सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयासाठी परवानगी असणार आहे, ही माहिती काल पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिली होती.