दिलासादायक! पुण्यात  गेल्या २४ तासांत ९७ कोरोनाबाधित

साेमवारी काेराेनाबाधित रुग्णांच्या तुलनेत काेराेनामुक्त हाेणाऱ्यांची संख्या अधिक आल्याने सक्रीय रुग्णांची संख्या देखील दाेन हजाराच्या खाली आली आहे. सध्या शहरात १ हजार ९३६ सक्रीय रुग्ण असून, त्यापैकी २०५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या चाेवीस तासांत ५ हजार ७७८ संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या गेल्या.

    पुणे : गेल्या काही महिन्यानंतर प्रथमच शहरातील काेराेना बाधित नवीन रुग्णांची संख्या शंभराच्या आत आली आहे. गेल्या चाेवीस तासांत ९७ नवीन रुग्ण आढळून आले तर २३३ जण काेराेनामुक्त झाले अाहे. तर शहरातील पाच जणांसह एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे.

    साेमवारी काेराेनाबाधित रुग्णांच्या तुलनेत काेराेनामुक्त हाेणाऱ्यांची संख्या अधिक आल्याने सक्रीय रुग्णांची संख्या देखील दाेन हजाराच्या खाली आली आहे. सध्या शहरात १ हजार ९३६ सक्रीय रुग्ण असून, त्यापैकी २०५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या चाेवीस तासांत ५ हजार ७७८ संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या गेल्या. आजपर्यंत एकूण ४ लाख ९१ हजार ९५९ जणांना काेराेनाची लागण झाली हाेती, त्यापैकी ४ लाख ८१ हजार १३३ जणांनी काेराेनावर मात केली. आजपर्यंत एकुण ८ हजार ८९० जणांचा मृत्यू झाला आहे.