जिल्हा नियोजन फंडातून शीव रस्त्याच्या कामाला सुरवात

वाघोली : (ता. हवेली) आव्हाळवाडी, मांजरी, केसनंद, थेऊर या गावांच्या शीव रस्त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री यांना जिल्हा नियोजन फंडातून पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु लॉकडाऊन

 वाघोली : (ता. हवेली) आव्हाळवाडी, मांजरी, केसनंद, थेऊर या गावांच्या शीव रस्त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री यांना जिल्हा नियोजन फंडातून पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्याच्या कामाला विलंब झाला होता. पावसाळा सुरु होण्यापूर्वी शीव रस्त्याचे काम सुरु झाल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.    

पूर्व हवेलीतील आव्हाळवाडी मांजरी, केसनंद, थेऊर रोड  या गावांच्या शिवेवरून जाणारा रस्ता करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे  व ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे यांनी पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट व तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांचेकडे शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी केलेल्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता. मागणीची दखल घेत त्यानुसार गिरीश बापट यांनी जिल्हा नियोजन फंडातून शीव रस्त्यासाठी पन्नास लाखांचा निधी मंजूर केला होता. लॉकडाऊनमुळे रस्त्याच्या कामाला विलंब झाला होता. परंतु पावसाळा तोंडावर आल्यामुळे रस्त्याचे काम सुरु झाले आहे. आव्हाळवाडी, मांजरी, केसनंद, कोलवडी या गावांमधील शेतकऱ्यांना  हा रस्ता महत्वाचा ठरणार असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.