गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध: विठ्ठल जगताप

माळशिरस: पुरंदर तालुक्यातील आंबळे ग्रामपंचायतीची निवडणुक जाहीर झालेली असताना ढवळेश्वर ग्रामक्रांती पँनेलच्या प्रचाराचा शुभारंभ गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात नारळ फोडुन करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ

माळशिरस: पुरंदर तालुक्यातील आंबळे ग्रामपंचायतीची निवडणुक जाहीर झालेली असताना ढवळेश्वर ग्रामक्रांती पँनेलच्या प्रचाराचा शुभारंभ गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात नारळ फोडुन करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.

गावच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने येणार्या पाच वर्षात काम करुन गावच्या सर्वांगीण विकासासाठी ढवळेश्वर ग्रामक्रांती पँनेल कटिबद्ध असल्याचे पँनेलचे उमेदवार विठ्ठल जगताप यांनी सांगीतले.
एक युवा उद्योजक तसेच सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे विठ्ठल जगताप यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जाते.