बारामतीतील मदरस्याचा कारभार नियमानुसारच तक्रारदारांचे आरोप तथ्यहिन : विश्वस्तांचा दावा

वास्तविक गावातील लोकांकडून मदरसाने कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने रक्कम गोळा केलेली नसून नागरीकांनी स्वखुशीने जकात, सदका, फितरा, हदिया म्हणुन खकम संस्थेस दिलेली आहे.

बारामती: दारूल उलूम मौलाना युनूसिया (मदरसा) बारामती या संस्थेचा पारदर्शक व स्वच्छ कारभार असून दरवर्षी लेखापरिक्षण होत आहे,उच्च न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना या संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र तक्रारदार सोहेल शेख हे प्रसार माध्यमांना चुकीची माहिती देवून दिशाभूल करत असल्याचा आरोप या संस्थेच्या विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
यासंदर्भात अधिक माहिती देताना या संस्थेचे अध्यक्ष मुबारक हसन तांबोळी व विश्वस्त सलीम बागवान म्हणाले, बारामती येथील ‘दारूल उलुम मौलाना युनूसिया, बारामती’ याबाबत सोहेल गुलमोहम्मद शेख हा वेळोवेळी संस्थेची बदनामी करून नागरीकांना उलट-सुलट माहिती दिशाभुल करीत असून हायकोर्ट मुंबई यांनी धर्मादाय आयुक्त यांना या ही तक्रार निकाली काढण्याचे निर्देश दिलेले असून धर्मादाय आयुक्त यांनी ६ महिन्यांच्या आत चौकशी करावी, असे सांगितले आहे व सोहेल शेख हा नागरीकांची, पत्रकारांची दिशाभुल करून हायकोर्टाने ‘मदरशाची चौकशी करून कारवाई करा’ असे सांगून दिशाभुल करीत आहे. वास्तविक हायकोर्टने चौकशी करण्याचे आदेश दिलेले असताना गैरसमज निर्माण करून चौकशी करून कारवाई करा असे स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे, सोयीस्कररित्या शब्दरचना वापरून समाजामध्ये गैरसमज पसरविण्यात येत आहे.

‘दारूल उलूम मौलाना युनूसिया’ ही संस्था धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडे रजिस्टर्ड संस्था असून दारुल उलूम या अरबी शब्दाचा अर्थ ‘मदरसा’ होतो. याकरीताच संस्थेने ‘मदरसा दारूल उलुम मौलाना युनुसिया असे लिहीले होते. वास्तविक गावातील लोकांकडून मदरसाने कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने रक्कम गोळा केलेली नसून नागरीकांनी स्वखुशीने जकात, सदका, फितरा, हदिया म्हणुन खकम संस्थेस दिलेली आहे.

दारुल उलूम मौलाना युनूसिया या संस्थेचे स्थापनेपासून सन २०१९ पर्यंतचे सर्व लेखापरीक्षण अहवाल उपलब्ध आहेत, तो अहवाल उच्च न्यायालय मुंबई येथेही देण्यात आले होते ,व सोहेल शेख यांचे विधिज्ञ यांचेकडेही लेखापरीक्षण अहवाल उपलब्ध केलेले असून तसे सोहेल शेख यावे वकील सुशांत प्रभुणे यांनी दिलेली पोहोचसुध्दा उपलब्ध असून यावरून सोहेल शेख हा कशाप्रकारे लोकांची दिशाभुल करीत आहे स्पष्टपणे दिसून येते.

शगनशाह पीर दर्गा ट्रस्ट यांचे जागेवर झालेले बांधकाम निविदा काढून, वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊन, टेंडर काढण्यात आले. लोएस्ट पध्दतीने हे काम करून सर्व व्यवहार चेकद्वारे करण्यात आले आहेत. वास्तविक दारूल उलुम मौलाना युनूसिया (मदरसा) ही संस्था मा. धर्मादाय आयुक्त सो.पुणे येथे रजिस्टर असल्याने मा. वक्फ बोर्ड, औरंगाबाद याठिकाणी अहवाल दिलेला नसून यामधून सोहेल शेख हा लोकांची दिशाभुल करीत आहे.

सोहेल शेख हा सांगत असलेली तथाकथित मळद येथील गट नंबर २३४ मध्ये घेतलेल्या जागेशी दारूल उलूम मौलाना युनूसिया, बारामती या संस्थेचा काहीएक संबंध नाही ,तशाप्रकारचे पुरावे सोहेल शेख याच्याकडे असल्यास ते त्याने सक्तरित्या शाबित करावे. संस्थेच्या कोणत्याही विश्वस्ताने सोहेल यास काहीही लिहून दिलेले नसून त्याचे सासरे सलीम दस्तगीर बागवान यांचेवर दबाव आणून त्यांचेकडून त्यांच्या मुलीच्या प्रेमापोटी ‘प्रतिज्ञापत्र’ लिहून घेतलेले असून त्याचे सासरे सलीम दस्तगीर बागवान हे कधीही संस्थेचे विश्वस्त नव्हते व नाहीत.

एकीकडे सोहेल शेख त्याचे सासरे त्यांनी त्यास मुलीच्या प्रेमापोटी दिलेल्या ‘प्रतिज्ञापत्र’ च्या आधारे स्वतःचे सासरे यांना त्यानेच दिलेल्या प्रेस नोट मध्ये संस्थेचा ट्रस्टी घोषित करतो तर पुढे त्याच प्रेस नोट मध्ये दारूल उलूम मौलाना युनूसिया (मदरसा) बारामती या संस्थेच्या ट्रस्टी मध्ये त्याचे सासरे सलीम दस्तगीर बागवान यांचेच नाव टाकत नसून यावरून सोहेल शेख हा किती मोठा विरोधाभास निर्माण करीत आहे हे स्पष्टपणे दिसून येते.

वास्तविक सोहेल शेख याने यापुर्वीही संस्थेच्या ट्र्टीकडून खोटे नाटे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले असल्याबाबत टूरस्टीने संस्थेस लेखी प्रतिज्ञापत्राद्वारे शपथेवर कळविलेले आहे. तसेच उच्च न्यायालय, मुंबई (हायकोर्ट) यांनी दिलेल्या आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, हायकोर्टाने या प्रकरणाच्या गुणवत्तेबाबत कोणतेही मत व्यक्त केलेले नाही . सदरील प्रकरण हे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे जाऊन दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून चौकशी करून निकाली काढण्यात यावी, असे आदेश दिलेले असताना सोहेल शेख चुकीची माहिती देवून लोकांची दिशाभूल करत असल्याचे यावेळी सलीम बागवान यांनी सांगितले. यावेळी अमजद बागवान, अॅड मतीन बागवान, असिफ बागवान आदींसह सर्व विश्वस्त उपस्थित होते.