Dissatisfaction in BJP; Medha Kulkarni's revelation about leaving the party

कोथरुडच्या भाजपच्या रणरागिणी माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तींनी ऊसाचे गुऱ्हाळ चालवणाऱ्या महिलेला मारहाण केल्याची तक्रार कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार महिला आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    पुणे : कोथरुडच्या भाजपच्या रणरागिणी माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तींनी ऊसाचे गुऱ्हाळ चालवणाऱ्या महिलेला मारहाण केल्याची तक्रार कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार महिला आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    कोथरुड भागातील रामबाग कॉलनीतला गणेश कुंज सोसायटीच्या समोर एक ऊसाचे गुऱ्हाळ आहे. हे गुऱ्हाळ अनधिकृत जागेत सुरु असून त्यामुळे सोसायटीमधील नागरिकांना त्रास होत असल्याचे गणेश कुंज सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे. गुऱ्हाळामुळे डास आणि माशा वाढल्या असून सोसायटीतील काहींना डेंग्यूची लागण झाल्याची तक्रार गणेश कुंज सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी मेधा कुलकर्णी यांच्यासह हे गुऱ्हाळ हटवण्याचा प्रयत्न केला.

    हे गुऱ्हाळ चालवणाऱ्या दीपाली चव्हाण नावाच्या महिलेशी आणि तिच्या पतीशी त्यांची झटापट झाली. यावेळी गणेश कुंज सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तींसोबत मेधा कुलकर्णी यांनी मारहाण केल्याची तक्रार दीपाली चव्हाण यांनी केली आहे.