दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ मालकांकडून शेतकऱ्यांची ऊस दराबाबत लूट होत असल्याची तक्रार

पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस राजा तांबे यांची तक्रार ; कृषि उत्पन्न बाजार समितिला टाळा ठोकण्याचा दिला इशारा पारगाव : दौंड तालुक्यात बागयायती क्षेत्र खुप मोठ्या प्रमाणात आहे. पाणी मुबलक प्रमाणात

पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस राजाराम  तांबे यांची तक्रार ; कृषि उत्पन्न बाजार समितिला टाळा ठोकण्याचा दिला इशारा 

पारगाव : दौंड तालुक्यात बागायती क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे. पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे येथील शेतकरी आवर्जून ऊसाचे पिक घेत असतो.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या अस्मानी- सुल्तानी संकटाने बळीराजा हतबल झाला आहे.याच कालावधीत दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ मालकाकडून शेतकऱ्यांची ऊस दराबाबत मोठी लूट चालली आहे.

याबाबत पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस राजाराम  तांबे,शांताराम बांदल व सचिन शिंदे युवक उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस दौंड तालुका यांच्यावतीने कृषि उत्पन्न बाजार समिति दौंड यांना दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ मालकाकडून शेतकऱ्यांची उस दराबाबत होणारी लूट थांबण्यात यावी, अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले आहे.

राजाराम  तांबे यांनी सांगितले की,दौंड तालुक्यात आता पर्यन्त कुठल्याही राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवला नाही. फ़क्त गटातटाचे राजकारण करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे.तालुक्यात गुर्हाळ घरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना उस देण्यासाठी जास्त धावपळ करावी लागत नाही. परंतु तालुक्यात चार कारखाने आहेत तरीही उस शिल्लक राहतो.येथील सर्व गुळ बारामती व पुणेच्या मार्केटला पुरवला जातो.सध्याच्या परिस्थितिला महितीनुसार शेतकरी वर्गाकडुन १६०० ते १८०० रुपये प्रति टनाने  उस खरेदी केला जातो आणि पुढे गुळाची विक्री ३५०० ते ३८०० रुपये प्रति क्विंटलने केली जात आहे.सर्वाची गोळाबेरीज केली तर आमच्या शेतकरी वर्गाची ७०० ते ८०० रुपये नुकसान होत आहे.जो पक्ष बळीराजाला न्याय देईल त्याच्या पाठीमागे आम्ही सर्व तरुण एकत्र होऊन उभे राहू. येत्या १५ दिवसात जर तुम्ही सर्वांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला नाही तर आम्ही कृषि उत्पन्न बाजार समितिला टाळा ठोकु असा इशारा यावेळी राजाराम  तांबे यांनी दिला आहे.

“दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी समक्ष बारामती व पुणे येथील व्यापाऱ्यांची गुळदराबाबत भेट घेऊन सत्य परिस्थितीनुसार चौकशी करून दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गुर्हाळ मालकाकडून ऊसदराबाबत होणारी लूट थांबवण्यात यावी व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा.”

– शांताराम बांदल (सामाजिक कार्यकर्ते)