सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारींचा आरटीओकडून कचरा?

दौंड :दौंड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य अवजड वाहतूक होत असल्याच्या तक्रारींकडे बारामती आरटीओ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत असल्याने आरटीओच खडी व वाळू वाहतुकदारांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.

दौंड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर मोठया प्रमाणात नियमबाह्य अवजड वाहतूक होत असल्याने रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे, यामधील पालखी महामार्ग असलेला पाटस बारामती रस्त्यावर वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक खडीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्त्यावर भरेमोठे खड्डे पडले आहेत, तालुक्यातील मार्गांची अवस्था अशी झाली आहे की, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्त्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, तसेच याच मार्गावरील रोटी घाटात मोठमोठे खड्डे पडल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे,तसेच चौफुला सुपा व शिरूर मार्गावर नियमबाह्य अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्या उखडला आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दौंड तालुक्यातील रस्त्यांवर नियमबाह्य अजवड खडी व वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार बारामती आरटीओकडे केली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे, पण अध्याप पाटस बारामती व कानगाव मार्गावरील नियमबाह्य अवजड वाहतूक बंद करण्यास आरटीओ अधिकाऱ्यांना यश आले नाही, यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत, तसेच संबंधित मार्गाची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांना नियमबाह्य अवजड वाहतुकीचा मोठा आर्थिक भुलदंड सहन करावा लागत आहे, नियमबाह्य अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा होत असल्याने आरटीओ अधिकारी मूग गिळून गप्प का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, रोटी घाटात अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर अनेक खड्डे पडले असल्याने या मार्गावर अनेक अपघात होत आहेत, याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली करून संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या आहेत, पण शासकीय अधिकारीच तक्रारींची योग्य दखल घेत नसल्याने अधिकाऱ्यांविरोधात रोष निर्माण झाला आहे,

 

“दौंड तालुक्यातील नियमबाह्य अवडज खडी व वाळू वाहतूकी संदर्भात कडक कारवाईच्या सूचना बारामतीच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.”
– अजित शिंदे ( प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे)