भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्र लवकर पुर्ण करा-ॲड. नितीन लांडगे

पहिल्या मजल्यावर १२ बाय १२ मीटरच्या दोन मॅट, १२०० प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहेत. हे सर्व काम लवकरात पुर्ण करुन कुस्तीपटूंना प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करुन द्यावे, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिले.

    पिंपरी: भोसरी सर्व्हे क्रमांक एक येथे गावजत्रा मैदाना शेजारी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. जुलै २०१६ ला हे केंद्र उभारणीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत स्थापत्य विभागाचे नव्वद टक्के आणि विद्युत विभागाचे एैंशी टक्के काम पुर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पुर्ण करावे असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत.

    ॲड. नितीन लांडगे यांनी या ठिकाणी अधिका-यांसमवेत भेट देऊन कामाची पाहणी केली व आढावा बैठक घेतली. पहिल्या टप्प्यात १२ कोटी आणि दुस-या टप्प्यात स्थापत्य कामासाठी ९.१८ कोटी तर विद्युतच्या कामासाठी ५ कोटी रुपये असा एकूण २५ कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे. एकूण ८६०० चौरस मीटरच्या प्लॅटवर ५५११ चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे.

    यामध्ये तळमजल्यावर सरावासाठी हॉल, जीम, स्वच्छतागृह, ५०० व्यक्तींची व्यवस्था असणारे किचन, मेस, ५० व्यक्तींची निवास व्यवस्था होईल अशा आठ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर १२ बाय १२ मीटरच्या दोन मॅट, १२०० प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहेत. हे सर्व काम लवकरात पुर्ण करुन कुस्तीपटूंना प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करुन द्यावे, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिले. या आढावा बैठकीस स्थापत्य, विद्युत आणि क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.