बारामतीमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

    बारामती : सध्या पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढण्यास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करून या दरवाढीच्या विरोधात बारामती तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसने बारामती शहरातून सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला.

    बारामती शहरातील गुणवडी चौक येथील काँग्रेस भवन ते इंदापूर चौक येथे असणाऱ्या पेट्रोल पंपापर्यंत सायकल रॅली काढून व केंद्र सरकारचा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. आज काँग्रेसचे कार्यकर्ते मोदी सरकारचा निषेध म्हणून दिवसभर सायकल वापरणार असल्याचे वीरधवल गाडे यांनी सांगितले.

    यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य आकाश मोरे‌, तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, शहराध्यक्ष अशोक इंगोले, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वीरधवल गाडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष वैभव बुरुंगले, डॉक्टर विजय भिसे, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष ऍड. आकाश पांडे, राहुल वाबळे, शिवाजीराव काकडे, विपुल तावरे, सुशांत सोनवणे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.