काँग्रेस नेते व खासदार राजीव सातव काळाच्या पडद्याआड; कोरोनाशी झुंज अपयशी

काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे उपचारादरम्यान निधन झाले, रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून दिली माहिती. सातव यांना २२ एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. तेव्हा पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजकन बनली होती. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    पुणे : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे उपचारादरम्यान निधन झाले, रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून दिली माहिती. सातव यांना २२ एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. तेव्हा पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजकन बनली होती. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असलेल्या राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते.

    रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करुन दिली माहिती

    कोरोनाची लक्षणे

    19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

    कोण होते राजीव सातव ?

    45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते.. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

    काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळीकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.