लॉक डाऊन काळातही केली निसर्गाची जपणूक

शिक्रापूर : कोरोना सारख्या मोठ्या संकटाने जग हतबल झालेले असताना मात्र निसर्ग चांगल्या पद्धतीने फुलू लागला आहे.पशू पक्षी मनसोक्त विहार करताना निदर्शनास येत आहे.

 सणसवाडीतील निसर्गप्रेमींचे निसर्गासाठी मोठे योगदान

शिक्रापूर : कोरोना सारख्या मोठ्या संकटाने जग हतबल झालेले असताना मात्र निसर्ग चांगल्या पद्धतीने फुलू लागला आहे.पशू पक्षी मनसोक्त विहार करताना निदर्शनास येत आहे. निसर्ग टिकला तर जीवसृष्टी टिकणार हा संकल्प ज्यांनी स्वीकारला त्यांनी निसर्गाची जपणूक केली असून सणसवाडी (ता. शिरूर) येथील निसर्ग प्रेमींनी लॉक डाऊन काळातही निसर्गाची जपणूक करून आदर्श निर्माण केला आहे.
-पशू, पक्षी व वृक्ष संकटात
सणसवाडी (ता.शिरूर) येथील नरेश्वर मंदिर टेकडी परिसरात गेल्या चार वर्षा पासून नरेश्वर टेकडी स्मृतीवन समितीच्या वतीने जवळपास चार हजार देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन व संरक्षण केले जात असून सध्या लॉकडाऊन मुळे बाहेर पडणे मुश्कील असताना आणि कडक उन्हाळा असल्यामुळे जीवा बरोबर पशू, पक्षी व वृक्ष संकटात आले आहे. त्यामुळे निसर्ग टिकवयाचा असेल तर पाणी मिळेल अत्यावश्यक आहे. तर लॉकडाऊन व निसर्ग संवर्धन यांचा सुवर्ण मध्य साधून सणसवाडी निसर्ग प्रेमी मंडळींनी स्मृती वनाची जपणूक करण्यासाठी वेळापत्रक तयार करून सकाळच्या दोन टप्प्यात चार जण तर सायंकाळच्या दोन टप्प्यात चार जण असे दोन वक्ती झाडांना पाणी देत असून झाडांना आळी बांधणे, वाकून मोडू नये म्हणून आधार उभा करणे, पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठिक ठिकाणी भांडी भरून ठेवणे. पाण्याचे नियोजन करून मोटार, पाईप व्यवस्थित जागी ठेवणे, पक्षांसाठी मुठभर धान्य टाकणे अशी कामे केली जातात तसेच व्हॉटसअॅप वर केलेले काम व पुढच्या दोघांनी काय काम केले पाहीजे याची माहीती टाकून ग्रुप वरच संवाद साधला जातो.
-भर उन्हाळयात झाडे हिरवीगार
या कामासाठी सध्या ४० तरूण योगदान देत असून भर उन्हातही ही झाडे सध्या हिरवीगार आहेत. सणसवाडी येथील या स्मृती वनात काही व्यक्तींनी आपल्या प्रियजनांच्या स्मृती निमित्त तर काहींनी वाढदिवसा निमित्त तसेच काही कंपन्यांनी देशी वृक्ष देवून वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यामध्ये वड, पिंपळ, लिंब, चिंच, पळस, बेल आदी प्रमुख वृक्ष आहेत. मोकाट जनावरांचा उपद्रव होवू नये म्हणून कुंपण व लक्ष ठेवण्यात येत आहे. भर उन्हाळयात झाडे हिरवीगार झाली आहेत. त्यामुळे येथे आता पक्षी वास्तव्यास येत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पक्षांचा किलबिलाट ऐकूण मनाला प्रसन्न वाटत आहे.