स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली ”ही” महत्वाची माहिती

पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. यामुळे पुण्यातल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

    पुणे : पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. यामुळे पुण्यातल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी. आपल्या मागणीवरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनपा हद्दीतील कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

    दरम्यान या संदर्भातील मागणी आपण पालकमंत्री आढावा बैठकीत केली होती. सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत शर्थींसह परवानगी असेल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

    पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कॉन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.

    संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच ऑक्सिजनप्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी सुविधांच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे सर्व सुविधांयुक्त बळकटीकरणास प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.