भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट उधळला;पूर्वाश्रमी कार्यकर्त्यांने रचला होता कट

घाटे यांचा विकी उर्फ वितुल हा पूर्वी कार्यकर्ता होता. सध्या तो एका पक्षात आहे. दरम्यान त्याचा भाऊ येत्या पुणे महापालिका निवडणूकीसाठी इच्छुक आहे. तो घाटे यांच्या वॉर्डत आहे. त्यामुळे त्याने भाऊ सहज निवडून यावा यासाठी हा कट रचला असल्याची तक्रार नगरसेवक धीरज घाटे यांनी दिली आहे.

    पुणे : भाजप नगरसेवक धिरज घाटे यांच्या हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. त्यांच्याच पूर्वाश्रमी कार्यकर्त्यांने हा कट रचला अशी तक्रार त्यांनी पोलिसांना दिली आहे. त्यात तिघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने शहर राजकारणात खळबळ उडाली आहे.

    याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत विकी उर्फ वितुल वामन क्षिरसागर व मनोज संभीजी पाटोळे (रा. सानेगुरूजी नगर आंबीलओढा कॉलनी) या दोघांसह त्यांच्या तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत घाटे यांनी तक्रार दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, घाटे यांचा विकी उर्फ वितुल हा पूर्वी कार्यकर्ता होता. सध्या तो एका पक्षात आहे. दरम्यान त्याचा भाऊ येत्या पुणे महापालिका निवडणूकीसाठी इच्छुक आहे. तो घाटे यांच्या वॉर्डात आहे. त्यामुळे त्याने त्याचा भाऊ सहज निवडून यावा, यासाठी हा कट रचला असल्याची तक्रार घाटे यांनी दिली आहे. त्यात ते मला मारण्यासाठी एका हॉटेलात आले होते. हा प्रकार समजला व मी येथे असलेले सीसीटीव्ही पाहिले. माझी खात्री झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडे तक्रार दिली होती. युनिट तीनने या प्रकरणात तिघांना पकडले आहे.