dr-amol-kolhe-discussing-the-administrative-challenges-after-covid

प्रत्येकांनी संविधान वाचले पाहिजे, संविधान प्रत्येकाच्या मनात रूजविले पाहिजे असे मत शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डाॅ अमोल कोल्हे यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रांगणात संविधान उद्देशिका शिल्पाचे अनावरण करताना ते बोलत होते.

    हडपसर: स्वातंत्र्य मिळून जवळपास ७४ वर्ष झाले २ जानेवारी १९५० प्रजासत्ताक राज्य देश जाहिर झाला.संविधानाचा आपण सर्वांनी स्विकार केला.संपूर्ण खंडप्राय देशाला एकत्र एका धाग्यात बांधून ठेवण्याचे मोठे कार्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने केले. संविधानाने दिलेले अधिकार ,कर्तव्य, स्वातंत्र्य संविधाना मुळेच आज देश एकसंघ राहिला,डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे खाजगी पत्र व्यवहार करताना जय शिवरायाने करायचे,आज सर्वांना संविधानाचीच गरज वाटते,प्रत्येकांनी संविधान वाचले पाहिजे, संविधान प्रत्येकाच्या मनात रूजविले पाहिजे असे मत शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डाॅ अमोल कोल्हे यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रांगणात संविधान उद्देशिका शिल्पाचे अनावरण करताना ते बोलत होते.

    मनपा सह आयुक्त सोमनाथ बनकर यांच्या संकल्पनेतून नगरसेविका वैशाली बनकर यांच्या वार्डस्तरीय निधीतून संविधान उद्देशिका शिल्प उभारण्यात आले.यावेळी आमदार चेतन तुपे यांनी ही संविधानाचे महत्व उपस्थित नागरिकांना पटवून दिले.