श्रीराम जन्मभूमीत मंदिर उभारणीच्या कार्यासाठी २१ लाख रुपयांचा निधी

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारणीच्या कार्यासाठी इंदापूर तालुक्यातून २१ लाख रुपयांच्या निधीच्या धनादेशाचे हस्तांतरण माजी मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी संघाच्या मान्यवरांकडे करण्यात आले.

    इंदापूर :अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारणीच्या कार्यासाठी इंदापूर तालुक्यातून २१ लाख रुपयांच्या निधीच्या धनादेशाचे हस्तांतरण माजी मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी संघाच्या मान्यवरांकडे करण्यात आले.

    या कार्यास सर्वांची मदत व्हावी या उद्देशाने पाटील यांनी इंदापूर तालुक्यात विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करून नागरिकांना या ऐतिहासिक कार्यास योगदान देण्याचे आवाहन केले होते.या आवाहनास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.त्यामधून ही रक्कम जमा झाली.या माध्यमातून २१ लाख रुपये निधीचे संकलन झाले.आज संघाचे विभागीय संघचालक संभाजीराव गवारे,जिल्हा संघचालक दिलीप शिंदे,प्रांत सदस्य सुनील देशपांडे,प्रांत कार्यकर्ते हेमंतराव हरहरे, व्यवसाय वि. प्रांत मंडळ सदस्य दीपराव पेशवे,जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मासाळ, ज्येष्ठ मार्गदर्शक अतुल तेरखेडकर यांच्याकडे या धनादेशाचे हस्तांतरण करण्यात आले.भरत शहा,मारुतराव वणवे, लालासाहेब पवार,देवबा जाधव, शकील सय्यद,कैलास कदम, सत्यशील पाटील,महेंद्र रेडके,पिंटू काळे,बापू जामदार,भाऊसाहेब चोरमले,शिवाजी मखरे,सुभाष बोंगाणे,संदिपान कडवळे,विजय करचे,जावेद शेख,सचिन जामदार व इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.