बांधाच्या वादातून सख्या भावाला मारहाण

शिक्रापूर : वरुडे (ता. शिरूर) येथील शिंगाडवाडी येथे शेतातील बांधावरील दगड पाडल्याच्या कारणावरून सख्या भावाने व पुतण्याने शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाप लेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरुडे (ता. शिरूर) येथील शिंगाडवाडी येथील शेतकरी शांताराम शिंगाडे हे त्यांच्या जमीन गट नंबर ८८ च्या शेतात असताना त्यांच्या शेतातील बांधावर शांताराम यांचा भाऊ दिलीप शिंगाडे व पुतण्या सागर शिंगाडे हे बापलेक आले व त्यांनी शांताराम यांना तू शेताच्या बांधावरचा दगड का पाडला असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी शांताराम यांचा पुतण्या सागर याने हातातील खोऱ्याने शांताराम यांच्या पाठीत व पोटावर मारहाण करून जखमी केले, याबाबत शांताराम ठकाजी शिंगाडे रा. शिंगाडवाडी, वरुडे ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दिलीप ठकाजी शिंगाडे व सागर दिलीप शिंगाडे दोघे रा. रा. शिंगाडवाडी, वरुडे (ता. शिरूर) या बापलेकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार हे करत आहे.