Thief burglar opening door during house breaking penetration
Thief burglar opening door during house breaking penetration

कंपनीतील कामगारांच्या पगारासाठीचे ६० लाख रुपये बेडरूममधील लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते.आरोपी स्वयंपाकीने बनावट चावीद्वारे कपाट आणि लॉकर उघडून ६० लाख रुपये चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

    पिंपरी: कंपनीने नेमलेल्या स्वयंपाक्याने कामगारांच्या पगारासाठी लॉकरमध्ये ठेवलेले साठ लाख रुपये चोरले. ही घटना नेहरुनगर येथील महिंद्रा अ‍ॅण्टीया येथे घडल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.

    अजित राजहंस हे एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या स्मार्ट वल्र्ड अँड कम्युनिकेशन विभागात नोकरीला आहेत. त्यांनी आपल्या तीन सहकारी अभियंत्यांसाठी कंपनीमार्फत ‘कुक’ नेमला. अनोदकुमार यादव हा स्वयंपाकी यांच्यासमवेतच सदनिकेत एकत्र राहत असे. फिर्यादी राजहंस यांनी कंपनीतील कामगारांच्या पगारासाठीचे ६० लाख रुपये बेडरूममधील लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते.आरोपी स्वयंपाकीने बनावट चावीद्वारे कपाट आणि लॉकर उघडून ६० लाख रुपये चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

    अनोदकुमार राजकुमार यादव (वय २८, रा. कुमाडांडा, सदरापुर, बाराबंकी, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या स्वयंपाक्याचे नाव आहे. अजित संजयकुमार राजहंस (वय ३१, रा. महिंद्रा अ‍ॅण्टीया, नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.