जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधित मातेचा मृत्यू

गुरूवारी जिल्हा रूग्णालयात दिला जुळ्यांना जन्म अहमदनगर : नगर येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात (गुरुवारी) जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा आज (शुक्रवारी) सकाळी ८-४५ वाजता मृत्यू

गुरूवारी जिल्हा रूग्णालयात दिला जुळ्यांना जन्म
अहमदनगर :
 नगर येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात (गुरुवारी) जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा आज (शुक्रवारी) सकाळी ८-४५ वाजता मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणे ने दिली.

नगर तालुक्यातील निंबळक येथील या महिलेचे काल जिल्हा रुग्णालयात सिझरियन करण्यात आले होते. या महिलेने गुरुवारी एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला होता. दोन्ही बाळांची तब्बेत ठीक आहे. या महिलेला सीझ रियन प्रसूती झाल्यानंतर आयसियू मध्ये ठेवण्यात आले होते. कोरोना बाधीत असलेल्या या महिलेला न्यूमॅटिक लक्षणे होती. दरम्यान शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान जिल्हा रूग्णालयात या महिलेचे निधन झाले,अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांनी दिली.