मेट्रोच्या ५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पुणे : महामेट्रोच्या येरवडा येथील लेबर कॅम्प मध्ये १३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील इतर ५० कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

 पुणे : महामेट्रोच्या येरवडा येथील लेबर कॅम्प मध्ये १३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील इतर ५० कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ मेट्रोचे सर्व कर्मचारी कोरोनापासून दूर होते; पण अखेर मेट्रोचे कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आहेत.

वनज ते रामवाडी मेट्रो मार्गा निर्मितीचे काम देण्यात आलेल्या कंत्राटदारांने कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी येरवडा येथे लेबर कॅम्प उभारला आहे. या लेबर कॅम्प मध्ये तब्बल ३०० ते ४०० कर्मचारी राहत होते. मात्र लॉक डाऊन मध्ये शिथिलता दिल्यानंतर कर्मचारी आपापल्या गावी निघून गेले असून या आता कॅम्प मध्ये ६० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांमधील  इलेकट्रीशनला कोरोना संदर्भात काही लक्षण दिसून अली. त्यानंतर त्याची व  त्यांच्या सोबत एका खोलीत राहणाऱ्या २० जणांची कोरोना चाचणी करण्यात अली. त्यातील १३ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आल्या आहेत, अशी माहिती महामेट्रोचे सरव्यवस्थापक (जनसंपर्क) हेमंत सोनावणे यांनी दिली.
शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो प्रकल्पाची कामे अनेक ठिकाणी सुरू आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे तीन हजार श्रमिक कार्यरत होते. त्यांच्यापैकी बहुसंख्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची योग्य निगा राखली गेली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मेट्रोचे कर्मचारी करोनापासून दूर होते. सध्या मेट्रो प्रकल्पासाठी अवघे ८५० कर्मचारी कार्यरत असून हे १३ कर्मचारी वगळता इतर सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत, असा दावा महामेट्रोने केला आहे.