जुगाराच्या अड्ड्यामुळे परिसरात कोरोना ससंर्ग

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण लोणी काळभोर : पूर्व हवेली तालुक्यात अवैध जुगाराच्या अड्ड्यामुळे परिसरात कोरोना ससंर्गाचा फैलाव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका

 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोणी काळभोर :  पूर्व हवेली तालुक्यात अवैध जुगाराच्या अड्ड्यामुळे परिसरात कोरोना ससंर्गाचा फैलाव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बड्या हॉटेलमध्ये जुगार खेळणारे पैकी बरेच कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास शेकडो लोकांनी कोरोना चाचणी करण्यासाठी कोविड सेंटर कडे धाव घेतली आहे.
   गेल्या चार ते पास दिवसापूर्वी पुणे सोलापूर रोडवरील एका बड्या हॉटेलमध्ये जुगार खेळणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.फक्त जुगार खेळणारेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यदेखील कोरोनाबाधित झाले होते.हे एवढ्यावरच न थांबता त्यात अनेकजण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर, हॉटेलमध्ये येजा करणाऱ्या चार नामांकीत पाहुण्यांसह एक आचाऱी, असे पाच जण पॉझिटिव्ह असल्याचे निस्पन्न झाले.
  एका जुगार अड्ड्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.ग्रामीण भागात चालणाऱ्या जुगरापायी परिसरातील नागरिकांचे जीव धोक्यात आले असताना मात्र पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे.लॉकडाऊन काळात हॉटेल ,लॉज बंद असतानादेखील हा पत्ताचा डाव कोणाच्या आशीर्वादामुळे चालू होता असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.आर्थिक लोभापायी पोलीस प्रशासनाने सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आणले आहेत.ह्या महामारी रोगामुळे नागरिकांचे जगणे अवघड झाले असताना मात्र लोणी काळभोर पंचाक्रुशीत अवैध धंदे  जोमात चालू करण्यात आल्याने कोरोनाचा फैलाव वाढला आहे.ह्या वर पोलीस खात्यातील वरीष्ठा अधिकारी संबधितावर कारवाई करून लोणी काळभोर पोलीस प्रशासनावर कारवाई करणार का ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.