पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाचा संसर्ग

मागील आठवड्यात झालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीला ते उपस्थित होते. आज दुपारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना टेस्ट करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सर्व सरकारी अधिकारी आणि पोलिस अधिकारी त्यांच्या संपर्कात असल्याने आता पुढील नियोजन कसे केले जाते ते पहावे लागणार आहे

    पुणे: पुण्यात विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले सौरभ राव यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच सौरभ राव हे कोरोनाच्या संपूर्ण प्रक्रियेत कायम अग्रभागी राहिले होते. आज दुपारी त्यांचा कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आल्याचा अहवाल आला आहे.

    विभागीय आयुक्त स्तरावरील सर्व बैठकांना त्यांची उपस्थिती होती. याचबरोबर मागील आठवड्यात झालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीला ते उपस्थित होते. आज दुपारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना टेस्ट करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सर्व सरकारी अधिकारी आणि पोलिस अधिकारी त्यांच्या संपर्कात असल्याने आता पुढील नियोजन कसे केले जाते ते पहावे लागणार आहे. तसेच, संपर्कातील अधिकाऱ्यांनाही क्वारंटाई रहावे लागणार आहे.
    विशेष म्हणजे लसीकरण मोहिमेतही ते अग्रभागी होते. काही दिवसांपूर्वीच राव यांनी लसीचा पहिला डोसही घेतला होता. सौरभ राव हे विभागीय आयुक्त झाल्यानंतर कोरोना काळात लॉकडाऊन आणि आरोग्य विभागाचे अनेक महत्वाचे निर्णय आणि नियोजन त्यांच्या स्तरावर होत होते. महापालिकेबरोबर वेगवेगळ्या भागांत प्रतिबंधित क्षेत्र करणे असो की कशा पद्धितीने नियमांची अंमलबजावणी करायची हे ठरवणे असो ते कायमच थेट या भागांना भेटी देत पाहणी करत नियोजन करत होते.