पुरंदर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ; रुग्णांची संख्या झपाट्याने घटू लागली

सासवड: पुरंदर तालुक्यात गेली काही दिवसापासुन कोरोना रुग्णांची संख्या दोन, तिनवर आली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने तालुक्यातील नागरिकांना थोडाफार दिला मिळाला आहे. तालुक्यात सासवड, जेजुरी, खळद,सोनोरी, वाल्हे दिवे या गावात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. सासवड शहरात दररोज चाळीस पंचेचाळीस रुग्ण सापडत होते.

सासवड: पुरंदर तालुक्यात गेली काही दिवसापासुन कोरोना रुग्णांची संख्या दोन, तिनवर आली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने तालुक्यातील नागरिकांना थोडाफार दिला मिळाला आहे. तालुक्यात सासवड, जेजुरी, खळद,सोनोरी, वाल्हे दिवे या गावात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. सासवड शहरात दररोज चाळीस पंचेचाळीस रुग्ण सापडत होते. आता ही संख्या घटुन आज मितीला कोरोना पाॅझीटीव रुग्णांची संख्या अवघ्या दोन वर आली आहे. जेजुरी शहर व ग्रामीण भागात तर एकही रुग्ण आढळला नसल्याने समाधानाचे चिञ पाहायला मिळत आहे. तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या २ हजार ९५२ एवढी झाली होती यात ९७ जनांचा मृत्यू झाला तर २ हजार ८०० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्या आणण्यासाठी तालुक्यातील सर्वच प्रशासन यंञनेने खूप मेहनत घेतली आहे. लाॅकडाऊन कालावधीत पोलिसप्रशासनाने चोख व नियोजन बध्द बंदोबस्त ठेवल्याने कोरोनाची साखळी तोडण्यास मोठी मदत झाली. तालुका आरोग्य कर्मच्याऱ्यांंनी अपार कष्ट केले नागरिकांच्या सहकाऱ्यामुळे कोरोना संसर्ग लाट आटोक्यात आली असल्याचे दिसून येते.

पुरंदर तालुक्यातील रुग्णसंख्या अटोक्यात आली ही बाब अत्यंत महत्वाची आहे. तरी देखील नागरिकांनी गाफील न रहाता मास्क वापरणे सॅनिटायझर ने हात स्वच्छ करणे हात धुणे हे करणे गरजेचे आहे.

-डाॅ किरण राऊत, सासवड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक