शिक्रापुरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

शिक्रापूर : सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात एकामागे एक असे अनेक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. मोजक्या काही दिवसांपासून शिक्रापूर व परिसर कोरोना मुक्त होत असताना आता शिक्रापुरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून एका कंपनीतील कामगाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

 रांजणगावच्या नामांकित कंपनीचा कामगार पॉझिटिव्ह

शिक्रापूर : सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात एकामागे एक असे अनेक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. मोजक्या काही दिवसांपासून शिक्रापूर व परिसर कोरोना मुक्त होत असताना आता शिक्रापुरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून एका कंपनीतील कामगाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मलठण फाटा परिसरात राहणारा चाळीस वर्षीय इसम हा रांजणगाव गणपती येथे एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहे. सदर इसमाला सर्दी, खोकला, तापाचा त्रास होऊ लागल्याने तो शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयमध्ये उपचारासाठी गेला होता. तेथे त्याची तपासणी करून खबरदारी म्हणून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांनतर पुणे येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार करत त्याची कोरोना तपासणी केली असता त्याचा कोरोन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्णाचा कोरोन अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा यांसह आदींनी सदर रुग्णाच्या घरा जवळील सर्व परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने औषध फवारणी करत निर्जंतुकीकरण केले आहे. तर काही दिवस कोरोना पासून मुक्ती मिळाल्याने शिक्रापूर व परिसरातील नागरिक समाधानी असताना आता पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने शिक्रापूर सह परिसर हादरून गेला आहे. तर यावेळी बोलताना सदर रुग्णाची माहिती मिळाली असून त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहित संकलित करण्याचे काम सुरु असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.