शिरूरमध्ये कोरोनाचा शिरकाव

शिरूर : पनवेलवरून शिरूरला आलेल्या ५२ वर्षाय व्यक्तीचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील व शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

 शिरूर :  पनवेलवरून शिरूरला आलेल्या ५२ वर्षाय व्यक्तीचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील व शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. बाहेर गावावरून आलेला बाधित रूग्ण आढळुन आल्याने शिरूर शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.

          पनवेलवरून (दि.२७ ) रात्री चार जण शिरूरला नातेवाईकांकडे आले होते.  त्यांना नगरपरिषदेच्यावतीने (दि.२८ ) होम क्वारंटाईन करण्यात आले होते. सदर पनवेलवरून आलेल्या व्यक्तीची कोरोना तपासणी १९ मे रोजी पनवेलमध्ये करण्यात आली होती. सदर तपासणीचा अहवाल शुक्रवार (दि.२९ ) पाॅझिटिव्ह आल्यानंतर तेथील प्रशासनाने या व्यक्तीचा शोध घेतला असता त्यांना शिरूरला आल्याची माहिती मिळाली. तेथील प्रशासनाने सदर बाब कळवुन माहिती दिल्यानंतर शिरूर प्रांत यांनी सदर रूग्ण बाधित असल्याबाबतची माहिती डाॅ.पाटील व मुख्याधिकारी रोकडे यांना कळविल्यानंतर बाधित रूग्णाची तपासणी करून त्यांना तसेच बाधित रूग्णाचा २२ वर्षीय मुलामध्ये लक्षणे दिसुन येत असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवले. त्यांच्या संपर्कात आलेले उर्वरीत पनवेलवरून आलेल्या दोन महिला व शिरूर येथील चार नातेवाईक यांना कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील व मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.