थेऊर गावात कोरोनाचा शिरकाव

लोणी काळभोर : अष्टविनायकातील चिंतामणी गणपतीच्या नावाने प्रसिद्ध असणार्‍या थेऊर (ता. हवेली) गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील एका २७ वर्षाचा तरूण पोटाचा त्रास होतो म्हणून खाजगी

 लोणी काळभोर : अष्टविनायकातील चिंतामणी गणपतीच्या नावाने प्रसिद्ध असणार्‍या थेऊर (ता. हवेली) गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील एका २७ वर्षाचा तरूण पोटाचा त्रास होतो म्हणून खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेला असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. कोरोनाची लागण झालेला हा तरुण थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील पहिला स्थानिक रूग्ण आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरूण लोहगाव  येथील एका हॉटेलमध्ये काम करतो. त्याला त्रास होत असल्याने उपचारासाठी लोणी स्टेशन येथील खाजगी रुग्णालयांत दाखल केले होते. तेेथे करण्यात आलेल्या तपासणीत तो कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले. सध्या तो हडपसर येेेथील खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आहे.

याबाबत माहीती मिळताच कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राने थेऊर ग्रामपंचायतीच्या मदतीने या परीसराचे निर्जतुकीरण केले आहे. तसेच परिसर सिल करण्यात आला आहे. त्याच्या संपर्कात आलेले त्याच्या घरातील ९ नातेवाईक व ३ शेजारी अश्या एकूण १२ जणांना तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. नातेवाईक व घराशेजारी राहणारे यांना तपासणी साठी पाठवण्यात आले असले तरी हा तरुण एका हॉटेलमध्ये काम करत होता. त्यामुळे तेथे त्याच्या संपर्कात एकूण किती जण आले ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे आरोग्य विभागास त्याचा शोध घेण्यासाठी अथक परिश्रम करावे लागणार आहेत.

 नागरिकांनी न घाबरता शासनाच्या सुचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावयाचे आहे. सोशल डिस्टंन्सिगचे नियम पाळायचे असुन बाहेरील व्यक्ती थेऊरमध्ये रहावयास आलेस प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावयाची असून गर्दी टाळण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.